आरक्षण आर्थिक निकषावरच दिले पाहिजे : उदयनराजे

0
3

सातारा | मंडल आयोगामुळे देशाची वाट लागली असून, कुठलंही आरक्षण हे आर्थिक निकषावरचं दिलं गेलं पाहिजे असं म्हणत, राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी मंडल आयोगावर टीका केली आहे. ते धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आयोजीत केलेल्या बैठकीत बोलतं होते. दरम्यान उदयन राजे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ते पुढे बोलतांना म्हणाले की,‘धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु दिलं तर सगळ्यांना द्या अन्यथा कोणालाच आरक्षण देऊ नका.’दरम्यान या वेळी उदयनराजे यांनी कोणाचेही नाव न घेता या‘या जन्मात केलेली पापं इथंच फेडावी लागतात आणि म्हणूनच कॅन्सर, डायलेसीस सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं’अशी अप्रत्यक्ष टीका देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.