जागतिक इंटरनेट दिन विशेष

0
9

आजच्या जगात इंटरनेट म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची गरज होऊन बसली आहे. मग ते कामासाठी असो, मनोरंजनासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट हे लागतेच. पण काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती व साहजिकच यापुढेही इंटरनेटची गरज हि वाढतच जाणार. म्हणूनच आज आम्ही आपल्या साठी इंटरनेट म्हणजे नेमके काय? हे थोडक्यात सांगणार आहोत.

संगणकाने सर्व क्षेत्रात व घराघरात प्रवेश मिळविला आहे. शब्द, चित्र वा संगीत कोणत्याही प्रकारची माहिती संगणक साठवून ठेवू शकतो. त्यावर पाहिजे ते संस्कार करू शकतो. एखाद्या ऑफिसात अनेक संगणक असल्यास ते एकमेकांना जोडून त्यांचे जाळे वा ‘नेट` तयार केलेले असते. त्यामुळे हे संगणक एकमेकांत संवाद साधू शकतात. जगभरातील अशी सर्व जाळी नेट एकमेकांशी जोडली की होते इंटरनेट.

इंटरनेटचा शोध कुणी लावला ?
इंटरनेटचा शोध लावण्यामध्ये बऱ्याच लोकांचा सहवास होता. सर्वात अगोदर ‘लियोनार्ड क्लेरॉक’ यांनी इंटरनेट बनवण्याची योजना स्थापित केली, त्यानंतर १९६२ मध्ये लिकलीडर (J.C.R. Licklider) यांनी ‘रॉबेर्ट टेलर'(ROBERT TAYLOR) समवेत त्या योजनेमध्ये एक नेटवर्क(network) बनवले. ज्याचे नाव “ARPANET” असे होते.

इंटरनेटचा इतिहास
सर्वप्रथम, १९६९ मध्ये, अमेरिकेच्या रक्षा विभागामध्ये अॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी (एआरपीए) नावाचा एक नेटवर्क लॉन्च करण्यात आले, ज्याचा वापर गोपनीय माहिती पाठविण्यासाठी केला गेला. इ.स. १९७१ मध्ये सर्वात पहिला इमेल (E-mail) रे टोम्लीन्सोन (Ray Tomlinson) यांनी पाठवला. व पुढे जसजशे इंटरनेटचे फायदे दिसू लागले तसा इंटरनेट चा वापर वाढू लागला.

इंटरनेटचे उपयोग
आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपरयातून असलो तरीही एकमेकांशी बोलू शकतो.नवनवीन लोकांशी ओळख अगदी सहजरीत्या करु शकतो.
कुठलीही माहिती क्षणात कुठेही पाठवू शकतो. ऑणलाइन अभ्यास करून कुठल्याही विषयाबद्दल आपण शिक्षण घेऊ शकतो. महत्वाचे म्हणजे घरबसल्या आपण काहीही खरेदी करू शकतो. जगाविषयी संपूर्ण घडामोडी आपल्याला क्षणात आपल्या फोन किंवा संगणकावरती इंटरनेटमुळे त्वरित प्राप्त होते.

थोडक्यात, इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. इंटरनेटचा एक दोष म्हणजे त्यात माहितीचा असणारा न पेलवणारा साठा माहितीच्या समुद्रातून आपल्याला हवी ती माहिती मिळविणे ही एक मोठी मुश्किल गोष्ट आहे. अर्थात यासाठी विविध प्रकारचे शोधक प्रोग्रॅम (ब्राऊझर) बनविण्यात आले असून त्यांच्या साहाय्याने आवश्यक त्या माहितीचा शोध घेता येऊ शकतो.