दिवाळीनिमित्त Jio ने लॉन्च केली धमाकेदार ऑफर

0
4

मुंबई- टेलीकॉम ऑपरेटर कंपनी जिओने दिवळी आधीच ग्राहकांसाठी धमाकेदार प्लान लॉन्च केला आहे. दिवाळी जिओ असे या ऑफरचे नाव आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. या प्लानचा लाभ 18 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर मध्येच घेता येईल.

जिओने लॉन्च केलेल्या प्लानची किंमत 1699 रुपये आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह रोज 100 एसएमएस मिळणार आहे. या प्लानची मुदत एक वर्षासाठी असणार आहे.

जिओ दिवाळी प्लानमध्ये ग्राहकांना 547.5 जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना रोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर 64 केबीपीएसची स्पीड मिळणार आहे. ही कॅशबॅक तुम्हाला कूपनच्या रुपात मिळेल. एकूण 3 कूपनमध्ये ही ऑफर असेल. एका कूपनची किंमत 500 रुपये आहे.

याशिवाय 200 रुपयाच्या कूपनचा उपयोग ग्राहक रिलायंस डिजिटल एक्सप्रेस मिनी स्टोर्समध्ये करु शकता. यासाठी कमीतकमी 5000 रुपयांची खेरदी करावी लागेल.