निकने प्रियंकासाठी विकत घेतले एवढे महागडे घर

0
5

मुंबई : सध्या चर्चेत असलेल्या प्रियंका चोप्राने आपला बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला आहे. आता तिचे देशच नव्हे तर परदेशातही असंख्य फॅन आहेत. देसी गर्ल प्रियंकाने आपला जीवनसाथी म्हणून निकची निवड केली आहे. प्रियंका निकसोबत भारतातच लग्न करत आहे. पण असले तरीही लग्नानंतरचे तिचे घर हे अमेरिकेत असणार आहे.

इंटरनॅशनल मीडियानुसार, निकने प्रियंकासाठी अमेरिकेतील लॉस एंजलिसमध्ये 6.5 मिलियन डॉलरचं एक घर खरेदी केले आहे. याची भारतीय रुपयांत किंमत आहे 47.50 कोटी रुपये.

माहितीनुसार, प्रियंका आणि निकचे हे घर 5 बेडरूमच असून त्यामध्ये 4 बाथरूम असा एक सुंदर बंगला आहे. 4,129 स्केवर फीट असलेल्या या घरात मोठे स्विमींग पूल देखील आहे. निकने प्रियंकाला प्रपोझ करण्याअगोदरच हे घर खरेदी केले होते. प्रियंका – निक ही जोडी देशात – परदेशातही खूप लोकप्रिय झाली आहे. निक आणि प्रियंका 2 डिसेंबरला जोधपुरमध्ये लग्न करत आहेत.