निवडणुका आल्यावरच शिवसेना-भाजपला राम आठवतो; अजित पवार यांचा हल्लाबोल

0
7

पुणे– भाजप आणि शिवसेनेला समाजात धृवीकरण करायचय. निवडणुका आल्यावरच शिवसेना, भाजपाला राम आठवतो, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे. पिंपरीचिंचवड येथे आजोयत सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरून भाजप आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बाधण्यामागे भाजपाच राजकारण आहे. निवडणुका जवळ आल्या की चुनावी जुमले सुरु होतात. सूक्ष्म, लघु उद्योगाला ५९ मिनिटात एक कोटी कर्ज देणार सांगतात. हे इतकं कर्ज कसं देणार, शक्य तरी आहे का? निवडणुकीसाठी हे सर्व सुरु आहे. सरकारने नुसता दुष्काळ जाहीर केला. काहीच नियोजन नाही. भाजप सरकारचा भोंगळ कारभार सुरू आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.