नोव्हेंबर अखेरपर्यंत पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता

0
2

दिल्ली | जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वेगाने घसरत आहेत. त्यामुळे भारतातही येत्या काळात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार असल्याची चिन्हं आहेत. दराची नव्वदी गाठल्यानंतर, गेल्या पंधरवाड्यात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

इराणमधून तेल आयात करण्यावर अमेरिकेने निर्बंध लादले. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दराने उच्चांक गाठला. याचा परिणाम भारतातील पेट्रोल, डिझेलच्या दरावर देखील दिसला. परंतु, अमेरिकेचे हे निर्बंध झुगारून भारतासह युरोपातील अनेक राष्ट्रांनी पेट्रोलची आयात सुरू केली. यामुळे कच्च्या तेलाचे भाव गडगडले आहेत.

सध्या दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये लिटरच्या भावाने, तर मुंबईत ८३ रुपये लिटरच्या भावाने मिळते आहे. काही दिवसांपूर्वी देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने भारतात नव्वदी गाठली होती. त्यामुळे लोकांमध्ये प्रक्षोभाचे वातावरण होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.