पुढील वर्षी येणार जगातील पहिला वनप्लसचा 5G फोन !

0
4

मुंबई : 4G नंतर आता पुढच्या वर्षी किमान दोन 5G फ्लॅगशिप फोन येतील, अशी अपेक्षा दूरसंचार उपकरण कंपनी क्वालकॉमचे अध्यक्ष ख्रिश्चियानो अॅमन यांनी व्यक्त केली आहे. वनप्लसचे कार्ल पेई यांनी त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेचच तातडीने घोषणा केली की पुढच्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये वनप्लसचा 5G फोन बाजारात येईल.

वनप्लसचा जो पाचव्या पिढीच्या इंटरनेटला सपोर्ट करणारा फोन येईल तो स्नॅपड्रॅगनच्या X50 या मॉडेमवर आधारित असेल, असेही कार्ल पेई यांनी सांगितले. आपण लवकरात लवकर 5G फोन आणणार असल्याचे अनेक कंपन्यांनी जाहीर केले आहे. असुस, एचएमडी ग्लोबल (नोकिया फोन बनवणारी कंपनी), एलजी, मोटोरोला, ओप्पो, व्हीवो, शाओमी, सोनी या कंपन्यांनी क्वालकॉमला आश्वासन दिले आहे की, 5G साठी आम्हीही प्रयत्नशील असल्यामुळे आता पाचव्या पिढीच्या फोनसाठी जास्त प्रतिक्षा करावी लागणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, सध्या या यादीत सॅमसंग आणि अॅपल यांसारख्या कंपन्यांची नावे नाहीत. कारण, यांचे स्वतःचे निर्मिती तंत्र आहे. पाचव्या पिढीच्या फोनसाठी अॅपलही प्रयत्नशील असेल. असे म्हटले जात आहे.