फ्लॉफ ‘ठग्स’ची सुपरहिट कमाई, पहिल्याच दिवशी जमवला रेकॉर्ड ब्रेक ‘गल्ला’

0
8

मुंबई | मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान आणि शहेनशाह अमिताब बच्चन स्टारर बहुप्रतीक्षित चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्ताने गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समिक्षकांच्या टिकेचा सामना करावा लागला असला तरी चाहत्यांनी चित्रपटगृहात चांगलीच गर्दी केलेली पहायला मिळाली. चाहत्यांच्या प्रेमाच्या जोरावर ठग्स ऑफ हिंदोस्तानने पहिल्याच दिवसी 52.25 कोटी रुपये एवढी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी पन्नास कोटींची कमाई करणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. यापू्र्वी प्रदर्शित झालेल्या बहुबली चित्रपटाने पहिल्याच दिवशी पन्नास कोटींचा टप्पा पार केला होता. सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईची माहिती ट्विट केली आहे. यापूर्वी दिवळीत प्रदर्शीत झालेल्या सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 39 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर शाहरुख खानच्या ‘हॅप्पी न्यू इयर’ने 43 कोटींचा गल्ला जमवला होता. अमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने या दोन्ही चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले आहे.

खालील लिंकवर क्लिक करून वाचा सोशल मीडियावरील प्रतिक्रीया
ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तानची सोशल मीडियार खिल्‍ली, पाहा मजेशीर ट्विट्स