‘माझा अगडबम’ सिनेमात झळकणार ‘सैराट’ फेम तानाजी 

0
5

‘सैराट’मधील परश्याच्या मित्राला मिळाला नविन सिनेमा

अवघ्या माहाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ‘सैराट’ सिनेमातील ‘तानाजी गालगुंडे’ला आता एका नविन भूमिकेत पाहणार आहोत. ‘सैराट’ सिनेमात तानाजीने ‘प्रदिप’ची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेँक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. ‘सैराट’ सिनेमाच्या यशानंतर आर्ची आणि परश्याला नविन भूमिका लवकर मिळाल्या होत्या. मात्र तानाजीला नवीन भूमिकेसाठी बरीच प्रतिक्षा करावी लागली.

तानाजी आता ‘माझा अगडबम’ या मराठी चित्रपटात ‘वजने’ या भूमिकेत झळकणार आहे. ‘माझा अगडबम’ हा चित्रपट 10 वर्षाआधी प्रदर्षीत झालेल्या अगडबम चित्रपटाचा सिक्वल आहे. ‘वजने’ ही नाजुकाच्या मित्राची भूमिका आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर तृप्ती भोईर सुबोध भावे आणि उषा नाडकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत.