मी टू : कंगना-सोनममध्ये जुंपली

0
4

सोनमच्या वक्तव्यानंतर कंगनाची आगपाखड

 

बॉलिवूडमध्ये दोन यशस्वी अभिनेत्रींची एकमेकींशी मैत्री असण्याचे किस्से फार क्वचित ऐकायला मिळतात. परंतु, एकमेकींविरोधात त्यांनी केलेली वक्तव्य मात्र चांगलीच गाजतात. सध्या बॉलिवूडमधील अशाच दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये चांगलीच जुंपलीय. कंगना रणौत आणि सोनमहॉलिवूडमधील Me Too चळवळ सध्या बॉलिवूडमध्येही जोर धरत आहे. ‘क्वीन’चा दिग्दर्शक विकास बहलवर छेडछाडीचा आरोप केल्यानंतर या महिलेचे समर्थन करत अभिनेत्री कंगना रनौत हिनं त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विकास बहल हे सेक्ससंबंधीच्या गोष्टी माझ्याशी शेअर करायचे, असं खळबळजनक वक्तव्य कंगनानं केलं होतं. या सगळ्या प्रकरणाविषयी एका कार्यक्रमादरम्यान सोनम कपूरला प्रतिक्रिया विचारण्यात आली. ‘त्या तरुणीसोबत जे घडलं ते अतिशय दु:खद आहे.’ असं सोनम म्हणाली. परंतु, या प्रकरणी कंगनाने केलेल्या आरोपांविषयी तिला प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी मात्र ‘कंगना सतत वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असते. पण अनेकदा ती बोलत असलेल्या गोष्टींना गांभीर्यानं घेणं किंवा त्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. परंतु, मला कंगनाच्या साहसी वृत्तीचं नेहमीच कौतुक वाटतं’ असंही ती म्हणाली. परंतु, सोनमच्या या उत्तरावर कंगना प्रचंड संतापली.

स्वत:वर आरोप होत असताना कंगना कशी काय शांत राहिलं? त्यामुळे संतापलेल्या कंगनानंदेखील सोनमचा चांगलाच समाचार घेतला. ‘काही महिलांना योग्य तर काहींना अयोग्य ठरविण्याचा लायसन्स सोनमला मिळाला आहे का? माझ्या मतांवर अविश्वास दाखवणारी ही कोण?’ असे सवाल कंगनानं केलं. ‘सोनमला तिच्या वडिलांमुळे इतकी प्रसिद्धी मिळाली आहे. मात्र अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मी आज या ठिकाणी पोहोचले आहे.’असं म्हणत तिनं पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ‘नेपॉटिझम’च्या मुद्द्याला हात घातला.

सोनम अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडची सदिच्छा दूत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनम देशाचं नेतृत्त्व करते, त्यामुळे तिच्यासारख्या व्यक्तीकडून अशा वक्तव्यांची अपेक्षा नाही असंही कंगना म्हणाली.