मोदींना केवळ निवडणुकांपूर्वीच राम आठवतो – दिग्विजय सिंह

0
3

भोपाळ | पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फायरी झडताना दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर हल्लाबोल केला. मोदींना केवळ निवडणुकांपूर्वीच राम आठवत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच सर्वचं आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी ठरल्यांचं त्यांनी म्हंटलं आहे. दिग्विजय सिंह यांचा मुलगा आणि भावाने मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ते बोलतं होते.

ते म्हणाले की, मोदी सरकार प्रत्येक बाजूने अपयशी ठरले आहे. त्यांना रामाची केवळ निवडणुकीपूर्वीच आठवण येते. राम मंदिर उभारण्यास कोणतीच अडचण नाही. पण वादग्रस्त जागेवरच त्यांना ते मंदिर का उभारायचे आहे? जर वादग्रस्त जमिनीवर त्यांना मंदिर पाहिजे असेल तर न्यायालयाच्या आदेशाचे त्यांना पालन करावेच लागेल. दरम्यान, दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चांचोडा आणि मुलगा जयवर्धन सिंह हे राघोगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.