सोनाली करतेय कॅन्सरवर मात ; लवकरच मायदेशी परतणार

0
6

मुंबई –अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला जुलै महिन्यात हाय-ग्रेड कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून तिच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते. सध्या सोनालीच्या तब्येतीत सुधारणा होत असून येत्या डिसेंबर महिन्यात ती मायदेशी परत येऊ शकते असे तिची मैत्रीण नम्रता शिरोडकर हिने सांगितले.

नम्रता तिचा अभिनेता पति महेश बाबू आणि मुलांसोबत सुट्टीसाठी न्य़ूयॅार्कलामध्ये गेली होती. तिथे तिने सोनालीची भेट घेतली. नम्रताने एका वृत्तपत्राला मुलाखतीमध्ये सांगितलं की ‘सोनाली ही खूपच शूर आहे, आता ती पहिल्यासारखीच फिट दिसत असून ती लवकर तिचे आयुष्य पूर्वीसारखे करेल’. नम्रता आणि सोनालीने दोन तास गप्पा मारल्या. तसंच कॅन्सरला सामोरे जाताना सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून कसे तोंड दिले, तसंच आजारपणाविषयीचे चांगले-वाईट अनुभव सोनालीने नम्रताशी शेअर केले.