‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ संदर्भात ब्रिटिश खासदाराने ‘फटकारले’ मोदी सरकारला !

0
5
इंग्लंडच्या पार्लमेंटरिअन पीटर बोन यांनी ‘स्टेच्यू ऑफ युनिटी‘वरून भारताची कडक शब्दांत कानउघाडणी केली आहे.

इंग्लंड – जगातील सर्वांत उंच असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते काही दिवसापूंर्वी करण्यात आले होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही या स्मारकाबद्दल मोदी सरकारवर टीका होत आहे. इंग्लंडचे खासदार पीटर बोन यांनी मोदी सरकारने बनवलेल्या ‘स्टेच्यू ऑफ युनिटी‘ संदर्भात अक्षेप घेतला आहे.  इंग्लंडने भारताला ब्रिटिश करदात्यांच्या पैशांतून मोठ्या प्रमाणात भारताच्या विकासासाठी कर्ज दिले होते. मात्र तो पैसा अशा प्रकारे पुतळ्यावर खर्च करण्यात आला आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

इंग्लंडच्या अक्षेपाचे कारण –

इंग्लडंने भारत सरकारला 2012 साली ब्रिटिश करदात्यांच्या पैशांतून 1.17 कोटी पाऊंड्सचा निधी आर्थिक सहाय्य म्हणून पुरवला होता. मात्र भारत सरकारने त्यातील 330 दशलक्ष पाऊंड्स 597 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात खर्च केले. याच पारश्वभूमीवरून पीटर बोन यांनी भारत सरकारची कडक शब्दात कानउघाडणी केली आहे. त्यांनी भारत सरकारला उद्देशुन असे म्हटले की “आमच्याकडून 1.1 बिलियन पाऊंड्सचं सहाय्य घेऊन त्या रक्कमेतील 330 दशलक्ष पाऊंड्स पुतळ्यावर खर्च करणं हा निव्वळ मुर्खपणा आहे.” असं वक्तव्य बोन यांनी केलंय. तसंच भारताला पैसे पुरवायला नको, हेच यातून सिद्ध होतं. त्यांनी त्यांचे पैसे कशावर खर्च करावेत हा त्यांचा प्रश्न आहे. पण जर त्यांच्याकडे या पुतळ्यासाठी पैसे आहेत, तर नक्कीच त्या देशाला आपण पैसे द्यायला नको, असंही वक्तव्य त्यांनी केलंय.

2013 साली 268 मिलियन पाऊंड्सची, 2014 साली 278 मिलीयन पाऊंड्सची आणि 2015 साली 158 दशलक्ष पाऊंड्सची मदत इंग्लंडने भारताला केली. या शिवाय गुजरातमधील तरुणांमध्ये धार्मिक सहिष्णुता वाढावी, यासाठी 14,000 पाऊंड्स ची नगद रक्कमही इंग्लंडने गुजरातला दिली होती.