Ind vs WI : भारत- वेस्ट इंडिजमध्ये आज रंगणार दुसरा टी- 20 सामना

0
10

लखनऊ | भारतीय संघ आता मालिका जिंकून चाहत्यांचा दिवाळी साजरी करण्याचा आंनद द्विगुणित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत 31 वर्षांचा रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडिअममध्ये हा सामना होणार आहे. या स्टेडिअमवर हा पहिलाच अंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे.

दरम्यान, भारताने कसोटी आणि वनडे माहिलकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला. तर टी- 20 मालिकेतील पहिला सामनाही सहज जिंकला त्यामुळे या सानन्यातही भारत विजय मिळवेल असा विश्वास टीम इंडियाने व्यक्त केला आहे.

-प्रतिस्पर्धी संघ

भारतः रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाझ नदीम.

वेस्ट इंडिजः कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हिटमायेर, शाय होप, ओबेड मॅककॉय, कीमो पॉल, खेरी पेरी, कायरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रूव्हमॅन पॉव्हेल, दिनेश रामदिन, शेरफॅन रदरफर्ड, ओशॅन थॉमस.