मलायका अरोरा 10 वर्षे लहान अर्जुन कपूरशी करणार लग्‍न, ‘कॉफी विथ करण’मध्‍ये दिले संकेत

0
8

बॉलिवूडमध्‍ये सध्‍या मलायकरा अरोरा व अर्जुन कपूर यांच्‍या रिलेशनशीपची चर्चा चांगलीच रंगली आहे. मागील काही दिवसांपासून दोघेही एकत्र फिरताना दिसत आहेत. विशेष म्‍हणजे मलायकाने आपला वाढदिवस खास अर्जुन कपूरसोबत साजरा केला होता. अशातच हे कपल लग्‍न करून कायमचे एकत्र येणार असल्‍याचे संकेत स्‍वत: मलायकाने दिले आहे. मलायका अरोराने मागील वर्षीच अभिनेता-निर्माता अरबाज खानसोबत घटस्‍फोट घेतला होता.

मलायका अरोरा खान नुकतीच ‘कॉफी विथ करण 6’या शोमध्‍ये सहभागी झाली होती. यामध्‍ये करण जोहर मलायकाला गमतीने म्‍हणाला होता की, ‘हम सभी नीचे की ओर जा रहे हैं, और ये आपकी जिंदगी में भी जल्द होने वाला है’. यावर मलायका चांगलीच लाजली होती तसेच करणला शांत करण्‍याचाही तिने प्रयत्‍न केला. ‘प्लीज रूको, अभी रूको,’अशी विनवणी तिने करणला केली होती. करणचा हा इशारा मलायका आणि अर्जुन कपूरच्‍या रिलेशनशीपवरच होता, असे बोलले जात आहे. या शोनंतर लगेचच फिल्‍मफेअर मॅग्‍झीनने वृत्‍त दिले की, ‘मलायका व अर्जुन दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले आहेत. दोघेही आपल्या नात्यावर सध्या मौन बाळगून आहेत. पण एकमेकांसोबत ते अतिशय आनंदी आहे आणि पुढील लग्न करण्याचा निर्णय दोघांनीही घेतला आहे.’ हे वृत्‍त खरे मानले तर आपल्‍याला लवकरच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बोहल्‍यावर चढलेले दिसतील.