कर्नाटक पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा दारुण पराभव; काँग्रेस,जेडीएस आघाडीला मतदारांचा कौल

0
9

बेंगळुरु | कर्नाटकमध्ये झालेल्या लोकसभा अणि विधानसभेच्या पोटनिवडुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला लोकसभेच्या तीन जागांपौकी केवऴ एकाच जागेवर विजय मिळवता आता आहे. तर विधानसभेच्या दोन्हीही जागेवर भाजपला जेडीएस आणि कँग्रेसकडून सपाटून मार खावा लागला. लोकसभा आणि विधानसभेच्या पाच जांगापैकी भाजपला केवळ लोकसभेची एकच जागा जींकता आली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा भाजपसाठी मोठा धक्का मानण्यात येतं आहे.

कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता या रामनगर मतदारसंघातून तब्बल 1 लाख मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे एल. चंद्रशेखर यांचा पराभव केला. तर जमखंडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार न्यामगौडा हे 40 हजार मंतानी विजयी झालेत. त्यांनी भाजपचे उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांचा पराभव केला.

दुसरीकडे लोकसभेसाठी तीन जांगावर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील भाजपच्या वाट्याला केवळ एकच जागा आली. भाजपचा बालेकिल्ला मानण्यात येणाऱ्या बळ्ळारी मतदारसंघात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. काँग्रेसचे उमेदवार व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपाच्या जे शांता यांचा तब्बल 1लाख 84 हजार मतांनी पराभव केला आहे. तर मंड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएसचे उमेदवार एल आर शिवरामोगौडा यांनी भाजपच्या सिद्धरामय्या यांचा 3 लाख 84 हजार मंतांनी पराभव केला. विशेष म्हणजे सिद्धरामय्या हे विधानसभा निवडणुकांच्यावेळी भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. केवऴ एकमात्र शिमोगा लोकसभा मतदार संघात भाजपचा विजय झाला आहे. याठीकाणी भाजपचे बी वाय राघवेंद्र यांनी जेडीएसच्या उमेदवारावर 52 हजार मतांनी विजय मिळविला. राघवेंद्र हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे पुत्र आहेत.