भगवान राम स्‍वप्‍नात येत होते, धर्मपरिर्वतन करण्‍यास सांगत होते; म्‍हणून शहजादाचा झालो संजू राणा

0
5

उत्‍तर प्रदेशातील व्‍यक्‍तीने हा अजब दावा केला आहे.

शामली- उत्‍तर प्रदेशातील शामली येथील एका मुस्लिम व्‍यक्‍तीने आपल्‍या संपुर्ण कुटुंबासह धर्मांतर करुन हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. ‘माझ्‍या स्‍वप्‍नात भगवान राम आले. त्‍यांनीच मला धर्मपरिवर्तनाचा आदेश दिला‍’, असा दावा या व्‍यक्‍तीने केला आहे. शहजाद असे त्‍याचे पूर्वाश्रमीचे नाव आहे. धर्मांतरानंतर त्‍याने आता संजू राणा असे नाव धारण केले आहे.

‘प्रभू रामचंद्र मागील 15-20 दिवसांपासून माझ्या स्वप्नात येत होते. ते मला पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्यास सांगत होते. मात्र भगवान राम माझ्या स्वप्नात आले, हे माझ्या समाजाला कळल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया कशी असेल? याची चिंता मला होती असे’, संजू राणाने सांगितले. ‘आम्ही आधी हिंदूच होतो. काही शतकांपूर्वी परकीय आक्रमक इथे आले. त्यांनी माझ्या पूर्वजांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडला. मी आता माझ्या मूळाकडे परतत आहे’, अशी प्रतिक्रिया धर्मांतरानंतर संजू राणाने दिली.

‘मला जे भय वाटत होते त्यापेक्षा परिस्थिती वाईट होती. काही लोकांकडून मला धमक्या मिळाल्या होत्या. माझे काका सुद्धा माझ्या धर्मपरिवर्तनाच्या निर्णयाविरोधात होते’, असे संजू राणाने सांगितले. राणाने पोलिसांशी संपर्क साधून संरक्षणाची मागणी केली आहे. ‘पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन मी माझा जीव वाचवला. मला आता माझ्या मुलांची चिंता लागून राहिली आहे’, असे संजू राणाने सांगितले. संजूच्या जीवाला धोका असल्याबद्दल आम्हाला अद्यापपर्यंत कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही असे पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी सांगितले