Maha Budget 2018: शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार, विहिरी

0
30

मुंबईअर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचा दावा केला. यासाठी तब्बल 13 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्प असल्याने त्याचे प्रतिबिंब यात उमटले.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते. अर्थसंकल्पात कर्जमाफीसोबत सिंचन आणि जलसंपदा विभागासाठी अनेक तरतूदी दिसून आल्या.

आतापर्यंत राज्यातील 35.68 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असून त्यासाठी 13 हजार 782 कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. तर आगामी वर्षात जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदी

– शाश्वत शेतीसाठी पाणी गरजेचे, म्हणून मागेल त्याला शेततळी, जलयुक्त शिवार, विहिरी कार्यक्रम

– 3115 कोटी रुपयांची तरतुद पंतप्रधान सिंचन योजेनेसाठी, 26 प्रकल्प
– 8233 कोटी रुपयांची तरतुद जलसंपदा विभागासाठी

– रेशीम उद्योगासाठी 3 कोटी

– पाटबंधाऱ्याचे 50 प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट

– जलयुक्त शिवार योजनेसाठी 1500 कोटी

– वनशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी 15 कोटी

– सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटी

– रोहयो अंतर्गत आंबा, काजूच्या फळबागांसाठी 100 कोटी रुपये

– कांदा प्रक्रियेसाठी 50 कोटी

– कर्जमाफी अंतर्गत आतापर्यंत 35.68 लाख 13600 कोटी रुपयांचे वितरण

– 93 हजार कृषीपंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी 750 कोटींची तरतुद

– एसटी महामंडळाकडून शेतमाल वाहतुक सुरू करण्याची योजना

– राज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार (ई नाम)

– शेतकऱ्यांसाठी महासंग्राम ही योजना

– वन क्षेत्रात वनतळे व सिमेंट बंधाऱ्यांच्या बांधकाम करण्यासाठी 11 कोटी रू. निधीची तरतूद

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासाठी 40 कोटी रू. निधीची तरतूद