भाऊबीजेच्या दिवशीच तरुणाने पत्नी, मुलीला विष पाजून केली आत्महत्या

0
6

बीड | भाऊबीजेच्या दिवशीच एका तरुणाने पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीला विष पाजून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने घटनास्थळी एक चिठ्ठी सोडली आहे. ‘मला काही लोकांकडून त्रास आहे.’ असा उल्लेख त्यामध्ये आहे. भाऊबीजेच्या दिवशीच हे टोकाचे पाऊल उचलल्याने घटनास्थळी नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता.

योगेश शिंदे हा चालक म्हणून काम करत होता. त्याची शीतल (वय 28) आणि मुलगी श्रावणीसह (वय 5) तिथे राहत होता. शुक्रवारी पहाटे त्याने पत्नी आणि मुलीला विष पाजले. नंतर घरातील झाडलाच गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार गावकऱ्यांना समताच त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता अशी माहितीही समोर आली आहे. शिंदे कुटुंब पाच दिवसांपासून सासुरवाडीत राहत होते. आत्महत्येपूर्वी योगेशने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यात त्याने काही लोकांकडून त्रास दिला जात होता, असा उल्लेख केला होता. पोलीस आता या आधारे पुढील तपास करत आहेत.