MPचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना धक्का, मेहुण्याची काँग्रेससोबत हातमिळवणी

0
7

भोपाळ- मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या पत्नीचे भाऊ संयय सिंह यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. संजय सिंह यांचा काँग्रेस प्रवेश मध्य प्रदेश भाजपसाठी मोठा धक्का माणला जात आहे. आज काँग्रेस आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

कोण आहेत संजय सिंह..?
संजय सिंह मुख्यमत्री शिवराज सिंह यांच्या पत्नी साधना यांच्ये संख्खे भाऊ आहेत. संजय हे नीलाक्ष इंफ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीचे कार्यकर्ते आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात या कंपनीचे अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. विरोधी पक्ष नेते अजय सिंह यांनी त्यांच्यावर खोट्या कागदपत्राच्या आधारे ठेकेदार म्हणून नोंदनी केल्याचा आरोप केला होता. काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर संजय सिंह यांनी भाजपवर घरानेशाहीचा आरोप केला आहे. भाजपमध्ये केवळ नामदारांनाच संधी देण्यात येत असून कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.