मध्‍यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपने जाहीर केली दुसरी यादी, 17 उमेदवारांची घोषणा

0
7

इंदूर| मध्‍यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्‍ये 17 उमेदवारांच्‍या नावाची घोषणा करण्‍यात आली आहे. मात्र यामध्‍ये इंदूरमधील 9 जागांवरील उमेदवारांबाबत अद्याप घोषणा करण्‍यात आलेली नाही. यापूर्वी पहिल्‍या यादीत भाजपने 176 उमेदवारांची घोषणा केली होती. म्‍हणजेच मध्‍यप्रदेशमध्‍ये भाजपने आतापर्यंत 193 उमेदवारांच्‍या नावाची घोषणा केली आहे.

37 जागांवरील उमेदवारांची घोषणा होणे बाकी

मध्‍यप्रदेशमध्‍ये भाजपचे आता केवळ 37 जागांवरील उमेदवार घोषित करणे बाकी आहे. यामध्‍ये इंदूरमधील 9 जागांचा समावेश आहे. लोकसभा अध्‍यक्षा सुमित्रा महाजन आणि भाजपचे राष्‍ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी आपल्‍या मुलांसाठी इंदूरमधून कोणत्‍याही एका जागेसाठी तिकिटाची मागणी केली आहे. यामुळेच येथील तिकिटांची घोषणा करण्‍यात आली नाही, अशी माहिती आहे. याबाबतचा निर्णय भाजप अध्‍यक्ष अमित शहा घेणार आहेत.