‘ओला, उबेर’चा संप अखेर काही काळ स्थगित

0
4

 

15 नोव्हेंबर नंतर पुन्हा एकदा चर्चा होणार

मुंबई – गेल्या 12 दिवसा पासून चालू असलेला ओला, उबेर टॅक्सी संघटनांचा  संप अखेर आज 3 नोव्हेंबर रोजी स्थगीत करण्यात आला आहे.  आज मुंबईमध्ये परिवहण मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत ओला, उबेर टॅक्सी चालकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ओला, उबेर टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी संप स्थगीत करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

एन दिवाळीच्या सणात प्रवाशांची गैरसोय होता कामा नये म्हणुन हा संप 15 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. 15 तारखेनंतर पुन्हा एकदा चर्चा होणर आहे. आज मुंबईमध्ये परिवहण मंत्री दिवाकर रावते यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रतेक ट्रिपमागे ओला आणि उबेर ड्रायव्हर्सना अधिक पैसे मिळावेत यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत इन्सेंटिव योजना लागू करण्यात आली आहे.