PNB Scam : मेहुल चोकसीचा साथीदार दीपक कुलकर्णीला अटक, ईडीची कारवाई

0
6

नवी दिल्ली | कर्ज बुडवून पळालेला आरोपी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. दीपक कुलकर्णी असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ईडी आणि सीबीआयने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हाँगकाँगहून परत आलेल्या दीपक कुलकर्णीला कोलाकाता विमानतळावर अटक करण्यात आली.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा फरार आरोपी नीरव मोदी याच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हाँगकाँगमध्ये कारवाई करून 255 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

नीरव मोदी याने विशेष पीएमएलए न्यायालयात वेगवेगळय़ा नऊ याचिका दाखल केल्या. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाला सहकार्य करत नसल्याच्या आरोपांसह अन्य आरोप मोदीने फेटाळले आहेत, तसेच या सर्व केसेस विशेष सीबीआय न्यायालयात वर्ग कराव्यात, अशी मागणी मोदीने केली आहे.