यापुढे भारतमाता ओवाळणार नाही, भाऊबीजेनिमित्‍त राज ठाकरेंचे मोदींना फटकारे

0
4

मुंबई – ‘गेल्‍या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे ओवाळणार नाही’, पंतप्रधान मोदी यांच्‍यामुळे भ्रमनिरास झालेल्‍या भारतमातचे असे चित्र रेखाटून मनसे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बोचरी ओवाळणी दिली आहे. आज भाऊबीजेनिमित्‍त प्रसिद्ध केलेल्‍या व्‍यंगचित्राद्वारे राज यांनी मोदींच्‍या 4 वर्षांच्‍या कारभारावर ताशेरे ओढले आहे.

या व्‍यंगचित्रात 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी जनतेला दिलेली आश्‍वासने आणि 2018 मधील याऊलट असलेली स्थिती राज ठाकरे यांनी दाखविली आहे. या आश्‍वसनांच्‍या फलकांमध्‍ये पंतप्रधान मोदी हे ओवाळणीसाठी पाटावर बसले आहेत. मात्र नाराज भारतमाता त्‍यांच्‍याकडे पाठ फिरवून उभी आहे. ‘ गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे नाही ओवाळणार!’ असे वाक्‍य भारतमातेच्‍या तोंडी घालत पुढील निवडणुकीत जनता मोदी यांना नाकारेल, असे संकेत राज ठाकरेंनी दिले आहे. राज ठाकरे यांनी हे व्‍यंगचित्र आपल्‍या फेसबुक पेजवर पोस्‍ट करताच 3 तासांत जवळपास 10 हजार जणांनी त्‍याला लाईक केले आहे.