उद्धव ठाकरेंकडून भाजप शिवसेना युतीचे संकेत

0
4

नाशिक | आगामी निवडणुंकासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये युती होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाचं, जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ते शनिवारी निफाड येथील विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की, शिवसेना सत्तेत राहून सरकारवरच टीका करते, असा अनेकांचा आक्षेप आहे. मात्र, मी सरकारवर टीका करत नाही तर जनतेच्या बाजूने बोलतो. जनतेच्या हितासाठी मी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे.यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने त्यांनी युतीबाबत समोपचाराची भाषा सुरू केल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजपवर टीका करत आले आहेत. मात्र, येणाऱ्या निवडणुंकामध्ये उद्धव ठकरे पुन्हा एकदा भाजपसोबत युती करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.